अहमदनगर: चारित्र्यावर संशय घेत चाकूने वार
Breaking News | Ahmednagar: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला शिवीगाळ करत चाकूने वार करून जखमी.
राहुरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला शिवीगाळ करत चाकूने वार करून जखमी केले. ही घटना दि. १४ रोजी वांबोरी येथे घडली.
या घटनेतील ४५ वर्षीय महिला खंडाबे खुर्द येथील रहिवासी असून, सध्या त्या वांबोरी येथे राहतात. त्यांचा पती नेहमी दारू पिऊन मारहाण करतो. दि. १४ रोजी दुपारी पत्नी घरात असताना आरोपी पती दारू पिऊन घरी आला व पत्नीला तू कुठे गेली होती, असे म्हणून त्याने पत्नीस मारहाण केली. तसेच चाकूने वार करून मुलाला कुंदळीच्या दांड्याने मारहाण केली. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११५ (२), ११८ (૧), રૂ૬૧ (૨), રૂપ૧ (3), 392 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Doubting the character and stabbing
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study