Home संगमनेर आ. बाळासाहेब थोरात अधिवेशनात महसूलमंत्री विखेंवर सोडले टीकास्त्र

आ. बाळासाहेब थोरात अधिवेशनात महसूलमंत्री विखेंवर सोडले टीकास्त्र

Ahmednagar News: संगमनेर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वाळू धोरणाच्या विरोधात  बोलताना माजी महसूल मंत्री, काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात. (Balasaheb Thorat).

come Balasaheb Thorat criticized Revenue Minister Vikhe in the session

संगमनेर: महसूल विभागाच्या वाळूच्या नव्या धोरणाने राज्याच्या तिजोरीत भर तर पडलीच नाही, उलट सरकारला भुर्दंड बसला. महसूल मंत्र्यांनी ज्या वाळू तस्करांवर गुन्हे दाखल होते, त्याच वाळू तस्करांना ठेके दिले. त्यांच्याकडून आता रात्री बेरात्री वाळूची तस्करी केली जाते.

गरीब माणसाला वाळू उपलब्ध होत नाही. त्याला काळ्या बाज ारातूनच वाळू विकत घ्यावी लागते. त्यालाही या नव्या धोरणाचा अतिरिक्त भुर्दंड बसत आहे. यामुळे राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वाळू धोरणाचा पुर्णतः बोजवारा उडाल्याचे टीकास्त्र माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. याचा नामोल्लेख न करता सोडले.

नागपूर येथे विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान काँग्रेस विधी मंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात बोलत होते. त्यांनी राज्य सरकारच्या महसूल विभागाचे फसलेले वाळू धोरण, तलाठी भरतीत झालेले गैरप्रकार, कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची भरती प्रक्रिया यावर जोरदार हल्ला चढविला.

आ. थोरात म्हणाले, नवे महसूल मंत्री आले त्यांनी नवे धोरण स्वीकारले. गोरगरिबांना परवडेल म्हणून ६०० रुपये प्रति ब्रास घरपोहच बाळू मिळेल, अशी राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा केली होती. त्याचा मला आनंद वाटला होता. जे आम्हाला जमले नाही ते नवे महसूल मंत्री करीत आहेत, मात्र सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या आमदारांनी छातीठोकपणे सांगावे की, आपल्या मतदार संघात ६०० रुपये प्रती ब्रास दराने वाळू मिळते का, आपला मुळ प्रश्न वाळू वाहतुकीचा खर्च कमी करणे हा होता, मात्र या नव्या धोरणाने अनेक प्रश्न निर्माण झाल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. वाळूचे उत्खनन करणे, डेपोमध्ये साठ वणूक करणे, वाळूची वाहतूक करणे या सगळ्यांसाठी जाहिराती देण्यात आल्या. हे सर्व ठेके कोणाला मिळाले, याचा शोध घेतल्यानंतर लक्षात येते की, हे सर्व तर महसूलमंत्र्यांचेच कार्यकर्ते आहेत. जुन्याच वाळू तस्करांना महसूलमंत्र्यांनी सन्मानाने ठेके दिले. या बाळू धोरणामुळे प्रशासनावर ताण निर्माण झाला. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडला धिकारी, तलाठी या सर्वांना डेपोचे रक्षण करण्याची वेळ आली. ज्यांना ठेके देण्यात आले त्यांच्याकडूनच वाळू वाहतुकीचे गैरप्रकार सुरू झाले. वाळूची वाहतूक रात्री करता येत नसताना देखील सर्रास रात्रभर वाहतूक सुरू आहे. वाळू डेपो मधूनच वाळूच्या चोऱ्या व्हायला लागल्या. हे सर्व करणारे लोक महसूल मंत्र्यांच्या मर्जीतले आहेत, असा घणाघात आ. थोरात यांनी महसूलमंत्री विखे पा. यांचे नाव न घेता केला.

ऑनलाइन नोंद करायला गेल्यावर वाळू उपलब्ध नसते, वाळू, कधी उपलब्ध होणार, किती वाजता ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार? किती वाजता संपणार? हे ठराविक लोकांनाच माहीत असते, अशा लोकांचे धक्कादायक रॅकेट राज्यभर निर्माण झाले. मी असं म्हणणार नाही

की, हे सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत, मात्र महसूलमंत्र्यांच्या मर्जीतले आहेत. मी त्यांना हे खात्रीने सांगतो, महसूलमंत्र्यांच्याच काही किलोमीटर परिसरामध्ये रात्री वाळूची वाहतूक सुरू आहे. ती वाहतूक करणारी मंडळी मंत्र्यांच्याच मर्जीतली आहे. रात्रभर वाळू वाहण्याचा धुमाकूळ राज्यभर सर्रास सुरू असल्याचा आरोप आ. थोरात यांनी केला.

तलाठी भरतीतील गैरप्रकाराला जबाबदार कोण?

महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेपोटी विद्यार्थ्यांकडून तब्बल १०० कोटी रुपये गोळा झाले, मात्र तरीही सरकारला या परीक्षेचे व्यवस्थापन घड करता आले नाही. संभाजीनगरच्या विद्यार्थ्याला नांदेड तर नांदेडच्या विद्यार्थ्याला अमरावती असे परीक्षा केंद्र देण्यात आले. तलाठी भरतीचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या नुक सानीची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे नाव न घेता नागपूर हिवाळी अधिवेशनात सभागृहात केला.

Web Title: come Balasaheb Thorat criticized Revenue Minister Vikhe in the session

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here