अहिल्यानगर: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ ! शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली
Maharashtra Kesari Competition: पंचाला लाथ मारल्याने गोंधळ उडाला आहे. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर पकडल्याने पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.
अहिल्यानगर: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर त्याने पंचाच्या निकालाविरोधात नाराजी व्यक्त करत त्यांना लाथ मारल्याचा व कॉलर पकडल्याने गोंधळ उडाला आहे.
अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून आले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपान्त्य फेरीसाठी सामना रंगला असताना पंचानी दिलेला निर्णय मान्य न झाल्यानेे शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्याने गोंधळ उडाला आहे. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर पकडल्याने पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. या गोंधळानंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले.
मात्र, माझी पाठ टेकली नव्हती, असे स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळले आहेत. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगला होता. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान मारले. त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगणार आहे.
Web Title: Chaos in the Maharashtra Kesari Competition! Shivraj Raksha kicked the referee
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News