Home अहिल्यानगर अहिल्यानगर: बस चालकाला तरुणाकडून मारहाण

अहिल्यानगर: बस चालकाला तरुणाकडून मारहाण

Breaking News | Ahilyanagar: बसच्या चालकाला व वाहकाला अज्ञात तरुणाने जबर मारहाण करण्याची घटना.

Bus driver beaten up by youth

पाथर्डी:  पाथर्डीहून नगरला प्रवासी बस घेऊन जाणार्‍या बसच्या चालकाला व वाहकाला अज्ञात तरुणाने जबर मारहाण करण्याची घटना बुधवार (दि. 12) रोजी घडली. या घटनेत चालक बाबाजी विश्वनाथ आव्हाड व वाहक सुभाष जयवंत जाधव जखमी झाले आहेत. यासंदर्भात वाहक जाधव यांनी अज्ञात आरोपी विरोधात मारहाणीचा व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आव्हाड व जाधव हे दोघेही पाथर्डी ते अहिल्यानगर क्रमांक एमएच बीटी 1042 ही बस घेऊन अहिल्यानगरला चालले होते.

बुधवारी आठवडे बाजारचा दिवस असल्याने बस हळू जात असताना शहरातील न्यायालयाच्या इमारतीसमोर एका अनोळखी तरुणाने बस थांबवत तो बसमध्ये चढला व त्याने मागच्या चौकात तुम्ही बस का थांबवली नाही, असे म्हणत त्याने अगोदर आव्हाड यांना मारहाण केली, तर वाहक जाधव हे त्याला समजावून सांगत असताना त्याने जाधव यांना सुद्धा मारहाण केली.

या घटनेत जाधव यांच्या गळ्याला व डोक्याला मार लागला आहे. वाहक व चालकाला मारहाण होत असताना मोठी गर्दी जमा होऊन नागरिकांनी मारहाण करणार्‍या तरुणाला रोखले. मात्र तो घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत  वाहक जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bus driver beaten up by youth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here