Breaking News Live: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी
मुंबई | Breaking News Live: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
आज ठाण्यात वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोज काहीना काही घटना घडत आहे. कधी आगीमुळे, कधी ऑक्सिजन मुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. आरोग्य मंत्री मात्र फक्त भाषण करत फिरत आहे. इतक्या घटना घडत असताना आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी का केली जात नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
Web Title: Breaking News Live Demand for expulsion of Health Minister Rajesh Tope