नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी केला महिलेवर अत्याचार
Rahuri | राहुरी: एका ३४ वर्षीय महिलेला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिला साडे सहा लाख रुपयांना गंडा (Fraud) घातलाच तसेच तिच्यावर वेळोवेळी शरीरिक अत्याचार (abused) केल्याची घटना राहुरी तालुक्यातून समोर आली आहे. याप्रकरणी दोघांवर फसवणूक व शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राहुरी तालुक्यातील एका 34 वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत म्हटले, सन 2020 ते एप्रिल 2022 या दरम्यान दोन आरोपींनी संगनमत करून त्या 34 वर्षीय महिलेला सरकारी नोकरी लावून देतो. तसेच लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याकडून साडेसहा लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली. त्यानंतर वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने राहुरी पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
त्या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी शकिल बागवान (रा. सोनई, ता. नेवासा) तसेच आनंदकुमार शहा (रा. पुणे) या दोघांविरोधात शारिरीक अत्याचाराचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून राहुरी पोलीस) त्यांचा शोध घेत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे हे करीत आहेत.
Web Title: Both of them abused the woman by showing the lure of getting a job