बेपत्ता व्यक्तीचे गोदावरी नदीत प्रेत आढळले
Breaking News | Ahilyanagar: सकाळी प्रवरासंगम गोदावरी नदीत त्यांचे प्रेत सापडले आहे.
नेवासा: सोनई तालुक्यातील सोनई येथील रमेश खंडुजी सुद्रिक (वय ५७) हे मंगळवार दि. २८ पासून बेपत्ता असल्याची खबर सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी प्रवरासंगम गोदावरी नदीत त्यांचे प्रेत सापडले आहे.
याबाबत माहिती अशी, की सुद्रिक हे सायंकाळी घरी न आल्याने कुटुंबीयांनी वडिलांच्या मित्रांना विचारपूस केली. याबाबत कोणालाच माहिती नसल्याने सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
सोनईसह परीसरात शोध घेतला असता ते कुठेही आढळुन आले नाही. प्रवरासंगम येथे गाडी असल्याची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांनी तेथे धाव घेतली असता तेथे गाडी व जवळील साहित्य सापडले. प्रवरासंगम पुलावर गाडी असल्याने मंगळवार सकाळपासून नदीत शोध घेतला जात होता. शुक्रवारी सकाळी गोदावरी नदीत प्रेत सापडले. नेवासा येथे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी शोकाकूल वातावरणात सोनईत अंत्यविधी करण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सुद्रिक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
Web Title: Body of missing person found in Godavari river
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News