Home अहिल्यानगर अहिल्यानगर: ट्रॅक्टर अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

अहिल्यानगर: ट्रॅक्टर अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन पती-पत्नीचा मृत्यू तर सात कामगार जखमी झाल्याची घटना.

Husband and wife die in tractor accident

पाथर्डी:  ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन पती-पत्नीचा मृत्यू तर सात कामगार जखमी झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील केळवंडी शिवारात घडली आहे. अनिल पिराजी राठोड (वय ३५), आरती अनिल राठोड (वय ३३, रा. वारुळा, ता. माजलगाव, बीड) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. कर्नाटक राज्यातील निपाणी येथील हलसिद्धीनाथ साखर कारखान्यावरून हे ऊस तोडणी कामगार बारामती छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरून पाथर्डी मार्गे शेवगाव येथील साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी येत होते.

त्यावेळी शुक्रवारी (दि.३१) रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर माणिकदौंडीचा घाट उतरून घाटाच्या पायथ्याशीच केळवंडी शिवारात आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात रंजना सतीश पवार (वय २६), भाऊसाहेब बाबु राठोड (वय २४), दीपक सुदाम साळवे (वय ३०), प्रेरणा दीपक आहेत.

साळवे (वय २४), आकांक्षा भाऊसाहेब राठोड (वय १९), नागोराव पोमा राठोड (वय २९, सर्व रा. राजेगाव ता. माजलगाव, बीड), सतीश शिवाजी पवार वय २७ (रा. वारुळा, ता. माजलगाव, बीड) हे जखमी झाले. या सर्व जखमींवर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विशाल वाघ यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी पाठविले. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास गायकवाड करत आहे.

Web Title: Husband and wife die in tractor accident

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here