ओमिक्रॉनबाबत राज्यसरकारचा मोठा निर्णय
Omicron: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, राज्यात परीस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यात अनेक रुग्णांना ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता ओमिक्रॉनची स्वतंत्र चाचणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची स्वतंत्र माहिती दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आजपर्यंत राज्यात एकूण 797 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 55 टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित असल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता यापुढे एकाही रुग्णाच्या नमुन्यांची ओमिक्रॉनसाठी जनुकीय चाचणी केली जाणार आहे. परिणामी , यापुढे एकही रुग्ण अधिकृतपणे ओमिक्रॉनबाधित म्हणून जाहीर केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात देखील पॉझिटिव्ह रेट वाढला असून ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमिक्रॉन हा सौम्य आहे, असं वारंवार सांगितलं जात आहे.
मात्र ओमिक्रॉनला सौम्य म्हणणं धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना ओमिक्रॉनबाबत सूचना दिल्या होत्या.
Web Title: Big decision of state government regarding Omicron