Home पुणे महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट

महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट

Weather Alert:  हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. (Rain Alert)

big crisis will hit Maharashtra; Schools holiday, high alert Rain

पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे, अनेक भागांना पावसाचा मोठा फटका बसला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यात आहे. पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यात हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईत पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान ढगाळ राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील 24 तासांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title: big crisis will hit Maharashtra; Schools holiday, high alert Rain

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here