Home महाराष्ट्र आश्रमशाळेतच विद्यार्थिनीने पेट्रोल टाकून पेटवून घेतले

आश्रमशाळेतच विद्यार्थिनीने पेट्रोल टाकून पेटवून घेतले

Breaking News | Palghar: आश्रमशाळेतील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने अंगावर पेट्रोल टाकून मंगळवारी स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चारच दिवसांपूर्वी घेतला होता प्रवेश.

ashram school itself, the student put petrol on fire

जव्हार: जव्हार तालुक्यातील देहरे (किरमिरा) या आश्रमशाळेतील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने अंगावर पेट्रोल टाकून मंगळवारी स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पायल डोके असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने देहरे आश्रमशाळेत ११ वी इयत्तेमध्ये चारच दिवसांपूर्वी प्रवेश घेतला होता.

दुपारच्या वेळी आश्रमशाळेच्या तिसऱ्या मजल्यावर तिने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले.

कारण अस्पष्टच या आत्महत्येमागील नेमके कारण समजले नाही. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. जव्हार पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

ही घटना समजल्यानंतर आश्रमशाळेतील शिक्षकाने तिला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले, मात्र, ९० टक्के भाजल्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

Web Title: ashram school itself, the student put petrol on fire

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here