Home अकोले भंडारदरा धरण ९३ टक्के भरले तर निळवंडे धरणातून प्रवरेत विसर्ग सुरु

भंडारदरा धरण ९३ टक्के भरले तर निळवंडे धरणातून प्रवरेत विसर्ग सुरु

Bhanadardara Dam: भंडारदरा धरण ९३ टक्के भरले, निळवंडे धरणातून २४०० 2400 क्युसेकपर्यंत प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात आला.

Bhandardara dam is 93 percent full, discharge from the Nilavande dam will begin

भंडारदरा: भंडारदरा धरण ९३ टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. निळवंडे धरणातून २४०० 2400 क्युसेकपर्यंत प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे. लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी होऊ लागल्याने तसेच पाणलोटात पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी काल शुक्रवारी दुपारी 3 वाजता भंडारदरा धरणाच्या विद्युतगृह क्रमांक 1 व स्पिलवेद्वारे 1915 क्यसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तसेच निळवंडे धरणातून सकाळी 800 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी 2400 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आले आहे.

काल दुपारनंतर भंडारदरासह पाणलोटात अधून मधून पावसाच्या जोरदरा सरी कोसळत आहेत. त्यामुळे गत बारा तासांत 98 दलघफू पाण्याची आवक झाली. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा सायंकाळी 10289 दलघफू (93 टक्के) होता. तर निळवंडेत 6811 दलघफू (81.78टक्के) पाणीसाठा होता. पाण्याची आवक काहीसी वाढल्याने या दोन्ही धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला आहे. वाकी तलावातूनही 556 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

मुळा धरण अपडेट:

मुळा पाणलोटातही काल सायंकाळनंतर पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे रात्रीतून काही प्रमाणात पाणी वाढण्याची शक्यता आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 387 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 18594 दलघफू (71.51टक्के) झाला होता. सायंकाळी हा पाणीसाठा 18776 दलघफू (72 टक्के) पाणीसाठा झाला होता. मुळा नदी सकाळी 4429 क्युसेकने वाहती होती. सायंकाळी 2829 क्यसुकेपर्यंत पाण्यात घट झाली होती.

Web Title: Bhandardara dam is 93 percent full, discharge from the Nilavande dam will begin

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here