बाळासाहेब थोरातांची माहिती: महाराष्ट्राचा तो महत्वाकांक्षी प्रकल्प राजस्थानने स्वीकारला
मुंबई | Balasaheb Thorat: राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण ठरलेला आणि आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राजस्थान राज्य शासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानच्या ई गिरदावरी प्रकल्पात सुधारणा करून हा प्रकल्प तेथे राबविला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
याबाबत थोरात म्हणाले की, महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या मदतीने ई-पीक पाहणी प्रकल्प विकसित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2021 पासून हा प्रकल्प राज्यव्यापी लागू केलेला आहे. हा प्रकल्प राज्यातील महसूल आणि कृषी विभागासाठी महत्वाचा अमुलाग्र बदल करणारा प्रकल्प ठरणार आहे. राजस्थान प्रमाणे देशातील इतर राज्यात देखील हा प्रकल्प स्वीकारुन लवकरच हा प्रकल्प देशव्यापी राबवला जाईल, आणि तो अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Web Title: Balasaheb thorat E-Crop Survey is an ambitious project decided by the Rajasthan State