Home अकोला हे बाळ माझ्या मुलाचं नाही, सासूचे शब्द ऐकून सुनेने संपवलं जीवन

हे बाळ माझ्या मुलाचं नाही, सासूचे शब्द ऐकून सुनेने संपवलं जीवन

Akola Crime: शासकीय रुग्णालयातील वॉर्ड नंबर २३ मध्ये एका बाळंतीणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

baby is not my son's, daughter-in-law ended her life after hearing mother-in-law's words Suicide

अकोला: अकोला जिल्हा सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील वॉर्ड नंबर २३ मध्ये १७ मार्चला एका बाळंतीणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे या महिलेचे १५ दिवसाचे बाळ देखील इथेच भरती होते. गोदावरी राजेश खिल्लारे असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे. विवाहितेला मुलगी झाल्याने पती, सासू व नणंदेने टोमणे मारून शिवीगाळ केली. पतीसह सासूने ‘तुला मुलगी झाली तर तू आम्हाला तोंडही दाखवू नको आणि घरात सुद्धा येऊ नको.’ असे बजावले होते. तसेच ही मुलगी माझ्या मुलाची नाही, असे म्हणत, विवाहितेचा छळ केल्याचा आरोप आहे. याच कारणावरुन गोदावरीने रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केल्याचा दावा मुलीच्या घरच्यांकडून केला जात आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी पती, सासूसह नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मृत विवाहितेचा भाऊ महादेव गणपत भोंगळ (वय, ३० राहणार मालेगाव, जि. वाशिम) यांच्या तक्रारीनुसार त्यांची चौथ्या नंबरची बहीण गोदावरी हिचे लग्न २०१९ रोजी नंदकुमार नारायण खिल्लारे (वय ३२, राहणार पंचशीलनगर, जि. वाशीम) याच्यासोबत झाले. बहिणीला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती नंदकुमार नारायण खिल्लारे, सासू कस्तुराबाई नारायण खिल्लारे, नणंद सोनू विट्ठल वैरागळे तिला नेहमी टोमणे मारत होते. पती तिला नेहमी दारू पिऊन मारहाण करायचा. बहीण गोदावरी खिल्लारे ही गरोदर असल्याने, तिला प्रसूतीकरिता अकोल्यात शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान २ मार्चला तिला मुलगी झाली. त्यामुळे बहीण गोदावरी हिचा पती, सासू व नणंदेने छळ सुरू केला. या छळाला कंटाळूनच गोदावरी खिल्लारे हिने आत्महत्या केली. या प्रकरणात भावाच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी पती, सासूसह नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू म्हणाले.

अकोला शासकीय रुग्णालयात १७ मार्च म्हणजेच शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली होती. वाशीम येथील पंचशील नगर येथील रहिवाशी २५ वर्षीय गोदावरी राजेश खिल्लारे ही महिला अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होती. या महिलेला इथे मुलगी झाली. तिचे १५ दिवसांचे बाळ अकोला सर्वोच्च रुग्णालयातील अकोला सर्वोपचार रुग्णालयात ‘सीसीयू’मध्ये भरती होते. अचानक गोदावरी बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी १५ मार्चपासून ती हरवली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यानंतर १७ मार्च रोजी सकाळी सफाई कामगार संपातून कामावर परतले असता, आणि वॉर्ड क्रमांक २३ चे बाथरूम तुटलेले दिसले. कर्मचाऱ्यांनी आत डोकावून पाहताच एका महिलेचा मृतदेह फासावर लटकलेला आढळून आला.

मृतदेह कुजल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने तातडीने तेथे दाखल असलेल्या सर्व बालकांना दुसऱ्या वॉर्डात हलवले. आत्महत्या केलेली महिला गोदावरी असल्याच समोर आलं. दरम्यान तेव्हा सासरच्या मंडळींनी गोदावरीला मानसिक त्रास दिल्याचा आरोप कुटुंबीयांकडून झाला होता. दरम्यान गोदावरीला सासरच्याकडून मानसिक त्रास दिला जायचा, त्यातूनच तिने आत्महत्या केली. आता या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मृत महिलेचा भाऊ महादेव भोंगळ यांनी केली आहे.

Web Title: baby is not my son’s, daughter-in-law ended her life after hearing mother-in-law’s words Suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here