Home अकोले रेशनिंग मालाची वाहतूक करणाऱ्याची जामिनावर मुक्तता

रेशनिंग मालाची वाहतूक करणाऱ्याची जामिनावर मुक्तता

Akole Release on bail of the person transporting the ration goods

अकोले | Akole: गेल्या आठवड्यात बुधवारी राजूर पोलिसांनी संशयास्पद चार ट्रक स्वस्त धान्याचे वाहतूक करणारे पकडले होते. याप्रकरणी राजूर पोलिसांनी ट्रक वाहन चालकांना अटक केली होती.

या चारही जणांना न्यायालयाने १७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर शनिवारी गोदामपालास अटक केली. चालक व गोदामपाल यांच्या चौकशीतून सबडीलर यास शनिवारी रात्रीच पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये गोदामपाल आणि सबडीलर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने या सहा जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सहा जणांची जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Akole Release on bail of the person transporting the ration goods

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here