Home अकोले जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य क्रांती दल प्रदेश अध्यक्षा सौ.राजश्री इरनक यांच्या उपस्थितीत...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य क्रांती दल प्रदेश अध्यक्षा सौ.राजश्री इरनक यांच्या उपस्थितीत सोहळा

Akole President of Eklavya Kranti Dal on the occasion of World Tribal Day

अकोले | Akole:  9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य क्रांती दल प्रदेश अध्यक्षा महाराष्ट्र राज्य.मुंबई. सौ.राजश्री इरनक यांच्या उपस्थित सोहळा साजरा करण्यात आला. त्यांच्या समवेत अनिता ताई दाभाडे, सुलभाताई भांगरे,संध्याताई जंगले उपस्थित होत्या.

प्रथम थोरा मोठ्यांचा आशिर्वाद घेऊन आदिवासी दिन सोहळा साजरा करणेसाठी खडकेद येथे. मा.जाधवसाहेब, सरपंच झडे सर आणि गावकरी यांच्या उपस्थितीत सर्व क्रांतीविरांना मानवंदना करण्यात आली. 

पुढील प्रवासात शेंडी येथे आदिम क्रांतीकारक यांना मानवंदना देण्यात आली. मा.यशवंत भांगरे यांच्या स्मारकास अभिवादन करून आ.डॉ. किरण लहामटे, मा.अशोक भांगरे, सुनिताताई भांगरे, अमित भांगरे व उपस्थीत समाज बांधवांना निरोप घेऊन पुढील कार्यक्रम सोहळासाठी भंडारदरा धरण चे नामकरण क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या नावाने करण्याचे मा.हृदयसम्राट मधूकरराव पिचड साहेब, आ.वैभवराव पिचड आणि सर्व समाजबांधव व महिला यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला.

निसर्गाबरोबर काही वेळ देत देवगाव येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकास मानवंदना देताना शहापूर ते अकोले व पाचपट्टा ,कोंभाळने व आजूबाजूच्या गावातील तरुण वर्ग उपस्थित होते. तेथून कोकणकडा निसर्ग आनंद व काही कुटूंबांच्या समस्या व अडचणी समजून घेऊन पुढे वाघोबा, भैरोबा दर्शन घेऊन पुन्हा घोटी ते अडसरे, सिन्नर फाटा महार्यालीची भेट उपस्थित मा. डॉ. श्रीराम लहामटे, आ.मा.कोकाटे साहेब व समाजबांधव. जय आदिवासी, जय एकलव्य, जय बिरसा, जय राघोजी गर्जना देत सर्व कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला.

आम्ही आदिवासी आमचे अस्तित्व आमचा अभिमान.

Web Title: Akole President of Eklavya Kranti Dal on the occasion of World Tribal Day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here