कामगाराने केला पत्नीचा गळा आवळून खून
अहमदनगर | Ahmednagar: एमआयडीसीतील कामगाराने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना ३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे.
लता संतोष पटोरकर असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भागीनाथ सूर्यभान कराळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून पोलिसांनी संतोष परसराम पाटोरकर वय २८ ता. धारणी जि. अमरावती याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष परसराम पाटोरकर हा पत्नीसमवेत काही दिवसांपूर्वी एमआयडीसी येथे कामाला आला होता. तो कराळे या अभियंत्याकडे काम करीत होता. ३ एप्रिलला रात्री एमआयडीसी येथील ब्रिज इंडस्ट्रीज या कंपनीच्या सेकुरिटी केबिनमध्ये त्याची पत्नी लता हिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज अठरे हे करीत आहे.
Web Title: Ahmednagar Worker strangles wife