Ahmednagar: कत्तलीसाठी आणली जनावरे, अवैध कत्तलखान्यावर मध्यरात्रीच छापा
अहमदनगर | Ahmednagar: संचारबंदी सुरु आहे तरीदेखील शहरातील झेंडीगेट भागातील अवैध कत्तलखाने सुरु होते. कोतवाली पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत २४ जनावरांची सुटका तसेच ३०० किलो मांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेकदा कारवाई करूनही हे अवैध धंदे सुरूच आहे. निर्बंध असले तरी ग्रामीण भागातून जनावरे आणली जात असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर शहरात मांस विकली जात आहे.
नगर शहराचे पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या पथकाने रविवारी रात्री ही कारवाई केली आहे. झेंडीगेट भागात कत्तलखाने सुरु असून तिथे जनावरे विविध ठिकाणी बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे पोलिसांनी छापा मारला. तेथे इसरार ऊर्फ इच्चु मुक्तार कुरेशी, तबरेज आबीद कुरेशी, मुज्जु जानेमीया कुरेशी, व तौफिक युनिस कुरेशी (सर्व रा. झेंडीगेट, अहमदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २४ जनावरांची सुटका करण्यात आली आहे. २ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Midnight raid on illegal slaughterhouse