Home Accident News अकोले घटना: ढंपरखाली चिरडले गेल्याने एका तरुणाचा मृत्यू

अकोले घटना: ढंपरखाली चिरडले गेल्याने एका तरुणाचा मृत्यू

Ahmednagar Accident News: कपारीवरुन दुचाकी घसरुन अपघात, तर याचवेळी पाठीमागून आलेल्या ढंपरखाली चिरडले गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, अर्धवट कामाने घेतला तरुणाचा बळी.

Accident youth died after being crushed under a blanket

अकोले: शहरातील एका चौकात रस्त्याच्या अर्धवट कामामुळे निर्माण झालेल्या कपारीवरुन दुचाकी घसरुन अपघात झाला. तर याचवेळी पाठीमागून आलेल्या ढंपरखाली चिरडले गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असणारी त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. सोमवारी रात्री हा अपघात झाला.अकोले नगरपंचायतीच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी हे विकासकामे अर्धवट अवस्थेत ठेवल्याने ते नागरीकांच्या जीवावर उठले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये नगरपंचायत व ठेकेदारांच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

हेमंत मधुकर अस्वले रा. वीरगाव ता. अकोले असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची पत्नी राणी हेमंत अस्वले ही गंभीर जखमी आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत हेमंत अस्वले व त्याची पत्नी राणी हे दोघे काल शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. सायंकाळी देवदर्शन आटवून हे दोघेजण परतीच्या प्रवासाला असताना अकोले शहरातील कराळे किराणा दुकानासमोर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कपारीमुळे घसरून खाली पडली. दरम्यान याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सरचा डंपरखाली सापडून हेमंत अस्वले हे गंभीर जखमी झाले. तर त्यांची पत्नी राणीलाई गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर या दोघांनाही शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच हेमंत अस्वले यांचा मृत्यू झाला. दरम्यान अकोले शहरातील कराळे किराणा दुकानासमोर गटारीचे व रस्त्याचे काम अगदी संथ गतीने सुरू आहे.  रस्ता करताना त्याला मोठी कपार ठेवण्यात आली आहे. तर वाहन चालकांना इशारा म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुचना फलक अथवा अटकाव करण्यात आलेला नाही. त्यामुळेच हेमंत अस्वले यांना या रस्त्याचा अंदाज आला नाही आणि हा भीषण अपघात घडला. या अपघाताला सर्वस्वी अकोले नगरपंचायत व संबंधित ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मयत हेमंत अस्वले हे युवा नेतृत्व होते. त्यांच्या अपघाती निधनाने वीरगाव, अकोले, संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. आज मंगळवारी सकाळी वीरगाव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास अकोले पोलीस करत आहेत.

Web Title: Accident youth died after being crushed under a blanket

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here