Home Accident News घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणताना अपघात, मूर्ती अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणताना अपघात, मूर्ती अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

Accident News: अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना.

Accident while bringing the idol of Goddess for installation, youth dies as idol falls on body

जळगाव: बऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती घेऊन येत असताना वाहनाचा अपघात (Accident) झाला. अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडल्याने जळगाव शहरातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरजवळील पूरणाड फाट्यानजीक घडली. संजय उर्फ जितू गोपाल कोळी (३५, रा. जोशी वाडा, मेहरुण) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात संजय सोबत असलेले इतर तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील जोशी वाड्यात सालाबादाप्रमाणे यावर्षीही नवरात्रीची तयारी सुरु होती. देवीची स्थापना करण्यासाठी मोठी तयारी या परिसरातील तरुणांकडून करण्यात आली होती. स्थापनेसाठी मूर्ती ही बऱ्हाणपूर येथून आणण्याचे ठरले होते, त्यानुसार त्याठिकाणच्या कारागिराला पाहिजे तशी मूर्तीची ऑर्डर सुध्दा देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी शनिवारी काही तरुण मूर्ती घेण्यासाठी बऱ्हाणपूर येथे गेले होते.

देवीची मूर्ती घेऊन परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाट्यावर मूर्ती घेवून येत असलेल्या वाहनाचा अपघात झाला. या घटनेत देवीची मूर्ती नेमकी वाहनात उभ्या असलेल्या संजय कोळी या तरुणाच्या अंगावर पडली. मूर्ती मोठी असल्याने मूर्ती खाली दाबला जावून संजय गंभीर जखमी झाला. त्याला वाहनातील इतर तरुणांनी तातडीने मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, याठिकाणी उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.  

Web Title: Accident while bringing the idol of Goddess for installation, youth dies as idol falls on body

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here