Home अहिल्यानगर अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग

अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग

Ahmednagar News: शिरडोह परिसरात रेल्वेला भीषण आग (Fire).

 

अहमदनगर: अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत रेल्वेचे तीन ते चार डब्बे जळून पूर्ण खाक झाले आहेत. अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

शिरडोह परिसरात रेल्वेला भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझविण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

अहमदनगर आणि आष्टी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गावरील रेल्वेला कोणत्या कारणामुळं लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. आग कशामुळं लागली याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. साडे तीन ते चारच्या दरम्यान आग लागल्याचं सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गाडीतील प्रवासी वेळेतच खाली उतरल्यानं बचावले आहेत. सुरुवातीला दोन डब्यांना आग लागली होती. आग लवकरच नियंत्रणात येईल असं, प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

अहमदनगर आणि आष्टी दरम्यान शिराडोह परिसरात रेल्वेच्या डब्याला ही आग लागली आहे. अहमदनगर आष्टी दरम्यानच्या रेल्वे सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्यानं प्रवासी संख्या कमी होती. यामुळं या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन वाजून २४ मिनिटांनी अहमदनगर तालुक्यातील वाळुंज येथे आष्टी अहमदनगर रेल्वे ला आग लागली आहे. रेल्वेचे अधिकारी आणि अग्निशामक दल तसेच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

Web Title: Ahmednagar-Ashti railway caught fire

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here