Home अहिल्यानगर गोळीबार करून पसार झालेल्या पोलीस कर्मचारी आरोपी बसस्थानकात पोलिसांच्या जाळ्यात अडकला

गोळीबार करून पसार झालेल्या पोलीस कर्मचारी आरोपी बसस्थानकात पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Ahmednagar News: रिव्हॉल्व्हर मधून अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेल्या पोलीस दलातील आरोपीस कोल्हार येथे एसटी बसमध्ये जेरबंद. (Arrested)

Arrested Accused in police force who escaped by indiscriminate firing from Kolhar

अहमदनगर | Kolhar: ठाणे जिल्ह्यात दोघांवर स्वतःच्या रिव्हॉल्व्हर मधून अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेल्या पोलीस दलातील आरोपीस कोल्हार येथे एसटी बसमध्ये जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदर कारवाई डीवायएसपी संदीप मिटके व लोणी पोलिसांनी केली असून त्याचेकडून अमेरिकन बनावटीचे रिव्हॉल्व्हर हस्तगत केली असल्याची माहिती शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली.

सूरज देवराम ढोकरे रा. मुंबई, पड़गा जिल्ह्या ठाणे असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून  मिळालेल्या माहितीनुसार वरील आरोपीने ठाणे जिल्ह्यातील पडगा पोलीस स्टेशन हद्दीत स्वतःच्या रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केला.

यामध्ये फियांदी अजीम अस्लम शेख व फिरोज आरिफ शेख दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचेवर १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आठ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याबाबत पडगा पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं ५३३/२३ भादवी कलम ३०७, ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल आहे.

मुंबई पोलीस दलात नायगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या आरोपीने दोघांवर गोळीबार करून पसार झाला होता. त्यानंतर नगर येथे एका हॉटेलमध्ये मुक्काम करून तो खाजगी वाहनाने नव्हे तर नगर- नाशिक बसमध्ये बसून प्रवास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मिळाली. त्यांचे सुचने नुसार कोल्हार येथे नाकाबंदी करण्यात आली.

तांत्रिक विशेषन व सीसीटीव्ही फुटेज वरून पसार आरोपीचे कपड़े व वर्णन सर्व पोलीस स्टेशन मध्ये आले होते. त्या अनुषंगाने शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके व लोणी पोलिसांनी सापळा लावला.

नगर-नाशिक बसमध्ये सदर आरोपी बसलेला होता. कोल्हार येथे सदर बस थांबताच बसमध्ये चोरी करणाऱ्या महिला आहेत अशी बतावणी करून लोणी पोलीस व संदीप मिटके यांनी बसमध्ये एन्ट्री करून त्यास जागेवर ताब्यात घेतले.

सदर बसमध्ये त्याच्या शर्टवरून डीवायएसपी संदीप मिटके, लोणीचे सपोनि युवराज आठरे, पीएसआय योगेश शिंदे व पोलीस ना. रवींद्र मेटे यांनी त्यास ओळखले आणि झडप घालून बसमध्येच त्यास रिकॉल्व्हरसह ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल सुरू असल्याने त्याचे लोकेशन सुद्धा विनासायास उपलब्ध झाले आणि पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात आरोपी अलगत अडकला.

Web Title: Arrested Accused in police force who escaped by indiscriminate firing from Kolhar

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here