Home पुणे Accident | नाशिक पुणे महामार्गावर दोन मालवाहू कंटेनरला अपघात

Accident | नाशिक पुणे महामार्गावर दोन मालवाहू कंटेनरला अपघात

Accident Two cargo containers crash on Nashik-Pune highway

आळेफाटा | Alephata:  नाशिक पुणे महामार्गावर आळेफाटानजीक दोन मालवाहू कंटेनरचा अपघात (Accident) झाला. यामध्ये दोन्ही कंटेनरचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. अचानक दोन कंटेनर समोर आल्याने एक रस्त्याच्या कडेला पाळती झाला तर दुसरा नियंत्रण सुटल्याने टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत घुसला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  आळेफाट्या नजीक दोन मालवाहू कंटेनरचा अपघात झाला. अचानक समोर कंटेनर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून इंदोर (मध्यप्रदेश) येथून पुण्याकडे जाणारा कंटेनर एन.एल 01 एडी 8531 रस्त्याच्या कडेला असलेल्या टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत घुसला. तर पुण्याकडून नाशिककडे जाणारा कंटेनर डी.डी 03 के 9408 रस्त्याच्याकडेला पलटी झाला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने आजूबाजू लोक जमा झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारपर्यंत वाहणे त्याच जागेवर होती.

Web Title: Accident Two cargo containers crash on Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here