Home Accident News Accident: मालट्रकच्या धडकेत मुलाचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको

Accident: मालट्रकच्या धडकेत मुलाचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको

Ahmednagar Accident: मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक, मुलाला १५० फूट फरफटत नेले.

Accident Child dies in collision with goods truck, block the way of villagers

अहमदनगर: नगर-दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद (ता. नगर) फाटा येथे भरधाव मालट्रकने दुचाकीला धडक देऊन मुलाला १५० फूट फरफटत नेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि.१) दुपारी मृत्यू झाला. धडक बसताच वडील दुचाकीहून बाजूला फेकले गेल्याने बचावले. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

ओम सुनील साळवे (वय ११, रा. बाबुर्डी बेंद, ता.नगर) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.

त्याचे वडील सुनील साळवे हे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने थोडक्यात बचावले. साळवे पिता-पुत्र हे झाला. त्यांच्या दुचाकीवर गुरुवारी सकाळी ८.४५च्या सुमारास दूध आणण्यासाठी जात होते. बाबुर्डी बेंद फाटा येथे ते नगर-दौंड महामार्गावर जात असताना श्रीगोंद्याकडून भरधाव आलेल्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी दुचाकी चालविणारे सुनील साळवे हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले तर पाठीमागे बसलेला ओम हा दुचाकीसह ट्रकखाली अडकून १५० फूट लांब फरफटत गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला ट्रक खालून बाहेर काढले. बाजार समितीचे माजी उपसभापती रेवणनाथ चोभे, सरपंच दीपक साळवे, वैभव खेंगट आदींनी त्यास तातडीने उपचारासाठी नगरमधील रुग्णालयात हलविले, मात्र उपचार सुरू असताना दुपारी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, सकाळी अपघातानंतर महेश चोभे, लहू कासार, राघू चोभे, डॉ. सुधीर च्या स्थानि ग्रामस्थांनी रस्ता रोको केला. बाबुर्डी बेंद फाटा व त्या पुढे घोसपुरी फाटा तर अपघाताचे ब्लॅक स्पॉट झालेले आहेत. आठवड्यात किमान २-३ अपघात होत आहेत. त्यातच भर म्हणून गॅसपाइप लाइनचे काम बंद पडलेले आहे. यावेळी गावाजवळ पर्यायी रस्ते तयार करून द्यावेत, रस्त्यावर पांढरे पट्टे दिसतील असे असावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचवेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले हे कुकडीच्या बैठकीसाठी श्रीगोंद्याकडे जात होते. त्यांनी जमावाला शांत करत ट्रकचालकाची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

Web Title: Accident Child dies in collision with goods truck, block the way of villagers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here