Home अहिल्यानगर अहमदनगर: कामाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

अहमदनगर: कामाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

Breaking News | Ahmednagar: विवाहितेसोबत ओळख करून कामाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (abused) केल्याचा प्रकार.

abused of married women by luring them to work

अहमदनगर: विवाहितेसोबत ओळख करून कामाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळची मध्यप्रदेश राज्यातील व सध्या नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विवाहितेने याप्रकरणी काल, शुक्रवारी (दि. १५) पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून नुरजमा कदीर खान (रा. बजाज कॉलनी, मुकुंदनगर) याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कुटुंबासह नगर तालुक्यातील एका गावात राहत असून त्या जानेवारीपासून नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात सिक्युरिटी म्हणून काम करतात. त्यांची नुरजमा कदीर खान याच्यासोबत ओळख झाली. त्याने फिर्यादीला, ‘मी तुम्हाला सिक्युरिटीचे काम पाहून देतो’ असे म्हणून त्यांचा नंबर घेतला. त्याने फिर्यादीला १६ जानेवारी रोजी सायंकाळी फोन करून छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील रेणुकानगर येथील एका रूमवर बोलून घेतले. तेथे त्याने सिक्युरिटीचे काम देतो म्हणून फिर्यादीवरून अत्याचार केला आहे. जर तु हे कोणाला सांगितले तर मी तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली.

दरम्यान खान याने १८ जानेवारी रोजी फिर्यादीला प्रेमदान हाडको येथील एका रूमवर नेऊन पुन्हा अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: abused of married women by luring them to work

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here