Home औरंगाबाद मतीमंद मुलीवर अत्याचार, महिलेसह दोघांवर गुन्हा

मतीमंद मुलीवर अत्याचार, महिलेसह दोघांवर गुन्हा

Breaking News | crime: मतीमंद अल्पवयीन मुलीवर लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना.

Abuse of mental retarded girl, crime against both women

वैजापूर: मतीमंद अल्पवयीन मुलीवर लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार दि. १० मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणात पीडित मुलीला तरुणाच्या हवाली करणाऱ्या महिलेसह दोघांवर वैजापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याप्रकरणी रोहीत चव्हाण (राहणार मुंबई, पूर्ण नाव माहीत नाही) व एक महिला (राहणारवैजापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी महिलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही गरीब कुटुंबातील असून वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेजारच्या गल्लीत राहणारी महिला हिचे पीडितेच्या घरासमोर राहणाऱ्या भाडेकरुकडे येणे जाणे होते. यातूनच या महिलेची या मुलीशी ओळख झाली. या ओळखीमुळे महिला पीडितेच्या घरी जात होती. ९ मार्च रोजी महिलेने पीडित मुलीला सोबत घेतले व शहराजवळ गंगापूर चौफुली येथे नेले.

त्यानंतर आरोपी रोहित चव्हाण हा चार चाकी गाडीमध्ये तिथे आला. त्यावेळी महिलेने चव्हाण यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले व मतिमंद मुलीला त्याच्या हवाली केले. एक तासात परत येतो, असे म्हणून त्याने मुलीला लॉजवर नेले व दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीला रविवारी दुपारी बारा वाजता सोडल्यानंतर ती घरी आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर आरोपींविरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कायद्याखाली वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नलवडे करीत आहेत.

Web Title: Abuse of mental retarded girl, crime against both women

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here