चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून
राहुरी | Rahuri: आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी घडली. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी सोमनाथ इंगवले हा आपली पत्नी अनिता, दोन लहान मुले राहुरी शहरातील तनपुरेवाडी येथे राहत आहे. सोमनाथ हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ व मारहाण करत असे.
बुधवारी २३ सप्टेबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पत्नीचा गळा दाबून तिचे जीवन संपविले. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात शवविचेदन अहवालात तिचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आहे.
दरम्यान मयत अनिता हिचे वडील योसेफ शहादू काळे रा. देवगाव ता. नेवासा यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Rahuri Murder by strangling wife on suspicion of character