जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गर्दनी येथील विद्यार्थी सागर नाडेकर याची नवोदय विद्यालयासाठी निवड
अकोले: जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गर्दनी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर या शाळेतील सागर राजेंद्र नाडेकर या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्याला वर्गशिक्षक संतोष कारभारी सदगीर सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. त्याच्या दैनंदिन अभ्यासात आई सौ. कमल व वडील राजेंद्र नाडेकर यांनी विशेष लक्ष दिले.
शाळेचे मुख्याध्यापक वेडे पी. सी. व इतर शिक्षक वृंद याबरोबरच केंद्रप्रमुख जगताप साहेब व विस्ताराधिकारी दोरगे साहेब यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुतडक, सर्व सदस्य, सरपंच लक्ष्मण दिघे, उपसरपंच किसन नाईकवाडी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती परबतराव नाईकवाडी तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Website Title: Latest News Akole Gardani student applies Navoday