Home बीड दोन मुलांची आई एका मुलाच्या बापासोबत पळाली

दोन मुलांची आई एका मुलाच्या बापासोबत पळाली

Breaking News | Beed Crime: २५ वर्षीय तरुणी आणि २९ वर्षाच्या तरुणाचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, ते दोघेही विवाहित असून त्या तरुणीला दोन मुले.

Mother of two runs away with father of one

केज : केज शहरातून विवाहित तरूणी आणि तरूण पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय तरुणी आणि २९ वर्षाच्या तरुणाचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, ते दोघेही विवाहित असून त्या तरुणीला दोन मुले आहेत. तर तिचा प्रियकर सुद्धा विवाहित असून त्यालाही एक मूल आहे. दोघांच्या कुटुंबियांनी केज पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या घटनेची शहरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोघे हरवल्याची वेगवेगळी तक्रार दाखल झाली आहे. केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेने चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Mother of two runs away with father of one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here