अहिल्यानगर: अंगावर स्पिरीट ओतून विवाहितेने पेटवून घेतले
Breaking News | Ahilyanagar: सासरच्या शारीरिक व मानसिक छळा कंटाळून विवाहितेने अंगावर स्पिरीट ओतून पेटवून घेतले.
नगर : सासरच्या शारीरिक व मानसिक छळा कंटाळून विवाहितेने अंगावर स्पिरीट ओतून पेटवून घेतले. विळद येथील विखे पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पती, सासू, सारसा व नंदेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ऋतुजा अतुल जोशी असे विवाहितेचे नाव आहे. तर, अतुल माधव जोशी, सासरा माधव लक्ष्मण जोशी, सासू सुनिता माधव जोशी, ननंद प्रियंका आडभाई, कोमल माधव जोशी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दत्तात्रय गणपत दातीर (रा. पिंपरी लौकी, ता. संगमनेर) एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
तीत म्हटले, वरील आरोपींनी संगमत करून मुलगी ऋतुजा हिला मानसिक व शारीरिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केले. तिने स्वतः च्या अंगावर स्पिरीट ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक जाधव गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
Web Title: After pouring spirit on the body, the married man set it on fire