धक्कादायक! बोगस अधिकाऱ्याकडून १२ तरुणींवर अत्याचार
Breaking News | Mumbai Crime: लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून क्राईम ब्रँच सायबर सेक्युरिटीचा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल १२ मुलींचे लैंगिक शोषण करून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार.
नालासोपारा : लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून क्राईम ब्रँच सायबर सेक्युरिटीचा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल १२ मुलींचे लैंगिक शोषण करून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वसईमध्ये समोर आला आहे. या ठकसेनाच्या हातात लग्नाच्या ऐवजी वालीव पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत. त्याच्याकडून आयफोन लॅपटॉप जप्त केला आहे. हिमांशू पांचाळ असे या ठकसेना आरोपीचे नाव आहे. आतापर्यंत त्याने १२ हून अधिक तरुणींना फसवून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
लग्न जुळविण्यासाठी वेबसाईटवर आपले नाव नोंदवतात. त्याचाच गैरफायदा अहमदाबाद येथे राहणाऱ्या ठकसेन हिमांशू पांचाळ याने उचलून त्याने आपले बनावट प्रोफाईल या वेबसाईटवर बनवले. क्राईम ब्रांचचा सायबर सेक्युरिटी अधिकारी असल्याचे भासवले. खानदानी श्रीमंत असून गल्लेलठ्ठ पगार, भरपूर मालमत्ता असल्याचे त्याने त्यात लिहिले होते. तो अनेक तरुणींना संपर्क करायचा. मग त्यांना भेटायला वसई, मुंबई परिसरातील लॉजमध्ये बोलवायचा. तेथे मुलींवर प्रभाव पाडायचा आणि त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवायचा. मुलींना आकर्षित करण्यासाठी तो नकली हिऱ्याचे दागिने भेट द्यायचा. पहिल्या भेटीतच तो तरुणींना शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. नंतर वेगवेगळी कारणे देत मुलींकडून पैसे उकळत होता. तरुणींशी संबंध बनवल्यानंतर पैसे, दागिने घेऊन तो फरार व्हायचा.
मिरा रोड येथील ३१ वर्षांच्या तरुणीने याबाबत ६ फेब्रुवारी रोजी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून तिची ओळख हिमांशू पांचाळ (२६) याच्याशी झाली होती. त्याने तिला वसईच्या एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर तिच्याशी बळजबरीने शरिरसंबंध देखील प्रस्थापित केले. २१ ते २३ जानेवारी रोजी त्याने तिला अहमदाबाद येथे बोलावून एका हॉटेलमध्ये तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या काळात आरोपी हिमांशू आणि पीडित तरुणींकडून आयफोन रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने गोड बोलून काढून घेतले. तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने वालीव पोलीस ठाणे गाठले. हिमांशू याच्या विरोधात पोलिसांनी तपासाला गती देत त्याला अटक केली आहे.
Web Title: 12 young women abused by bogus officer