संगमनेर: टोल नाक्यावरील हाणामारीच्या घटनेतील आरोपींना अटक
Sangamner Crime: येथील टोल नाक्यावर झालेल्या मारहाण प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर झालेल्या मारहाण प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने काल गुरुवारी (दि. २) नाशिक जिल्ह्यातून या आरोपींना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी अतुल राधावल्लभ कासट व त्यांच्या बंधूंना टोल नाक्यावर मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे संगमनेरात संताप व्यक्त करण्यात आला होता. अतुल कासट यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही आरोपी फरार झाले होते. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी तपास पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याचा सूचना दिल्या होत्या. पोलीस तपास पथकाने तांत्रिक, माहितीचे आधारे अमोल बाळु सरोदे (वय २७, रा. चंदनापूरी), किरण भास्कर राहणे (वय ३९, रा. चंदनापूरी), मंगेश बबन फटांगरे (वय २८, रा. वरूडी पठार, ता. संगमनेर) याचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हा केल्याचे मान्य केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
Web Title: Arrest of the accused in the clash at the toll booth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News