Home पुणे प्रेमसंबंधास नकार, तरुणीचे समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून बदनामी

प्रेमसंबंधास नकार, तरुणीचे समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून बदनामी

Breaking News | Pune Crime: प्रेमसंबंधास नकार दिल्यामुळे एका तरुणीचे समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला.

Rejection of love relationship, defamation of young woman by posting obscene pictures

पुणे:  प्रेमसंबंधास नकार दिल्यामुळे एका तरुणीचे समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तरुणीच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २१ वर्षीय तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध (वय २४) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  आरोपी तरुण आणि तरुणीची मैत्री होती. तरुणीने आरोपीला प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तरुणीच्या नावे समाज माध्यमावर बनावट खाते उघडले. त्या समाज माध्यमावर तरुणीचे अश्लील छायाचित्रे, मजकूर आणि मोबाईल क्रमांक प्रसारित केला.

तरुणीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने त्याच्याकडे विचारणा केली. आरोपीने तरुणीला शिवीगाळ केली. पोलिसांकडे तक्रार दिली तर तुला जीवे मारु, अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.

Web Title: Rejection of love relationship, defamation of young woman by posting obscene pictures

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here