Home महाराष्ट्र मध्यरात्री गर्लफ्रेंडसोबत मसाज पार्लरला गेला, चुलबुल पांडेची तिथेच हत्या

मध्यरात्री गर्लफ्रेंडसोबत मसाज पार्लरला गेला, चुलबुल पांडेची तिथेच हत्या

Breaking News | Mumbai Crime: चुलबुलचा मर्डर करून गायब, एका स्पा सेंटरमध्ये घडली घटना.

Chulbul Pandey was murdered there when he went to a massage parlor

मुंबई:  मायानगरी मुंबई कधीही झोपत नाही असं म्हणतात, रेस्टॉरंट, क्लब यामध्ये रात्रभर पार्ध्या सुरू असतात. परंतु याच मुंबईत मध्यरात्री घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ माजली आहे. २३ जुलैच्या रात्री १२.३० च्या सुमारास मुंबईच्या वरळी नाका परिसरात ५० वर्षीय व्यक्ती २१ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत मसाज पार्लरमध्ये पोहचला होता. या पार्लरला तो नेहमी यायचा त्यामुळे इथं काम करणाऱ्यांसोबत त्याची चांगली ओळख निर्माण झाली होती.

या स्पा सेंटरच्या क्लबमध्ये तो त्याचे मित्र आणि गर्लफ्रेंडसोबत बर्थ डे पार्टीसाठी गेला होता. मध्यरात्री पार्टी सुरू होती. दारु प्यायली होती. पार्टी संपवून ते लोक मसाज पार्लरला येतात. काही वेळाने सगळे लोक पार्लर बाहेर पडतात परतु तो व्यक्ती आणि त्याची गर्लफ्रेंड आतमध्येच थांबतात. काही मिनिटांनी २ अज्ञात व्यक्ती मसाज पार्लरमध्ये जाताना दिसतात. त्यानंतर अचानक मोठा आवाज ऐकू येतो आणि हे दोघं बाहेर पडतात. बाहेरचे लोक आतमध्ये जाऊन पाहतात तर ज्या व्यक्तीने थोड्या वेळापूर्वी बर्थ डे पार्टी केली होती तो रक्ताच्या थारोळ्यात दिसून येतो.

या घटनेची माहिती पोलिसांना कळते, त्यानंतर पोलीस घटनास्थळी येतात. यात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव गुरुसिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे होतं. अखेरच चुलबुल पांडेची हत्या कुणी केली असा सवाल पोलिसांना पडतो. ते अज्ञात २ जण कोण होते, ज्यांनी चुलबुलचा मर्डर करून गायब झाले या सर्वांची उत्तरे पोलीस शोधत होती. तपासात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीत या व्यक्तीच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली.

ज्या चुलबुल पांडेची हत्या झाली तो एक हिस्ट्रीशीटर होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्यावर बलात्कार, धमकी देणे आणि हत्येचा प्रयत्न यासारखे १० गंभीर गुन्हे दाखल होते. चुलबुल हा स्वतःला पोलिसांचा खबरी आणि आरटीआय कार्यकर्ता असल्याचं सांगायचा. १७ जुलैला त्याचा बर्थ डे होता. मंगळवारी रात्री तो सॉफ्ट टच स्पाला पोहचला. त्याठिकाणी काम करणाऱ्यांनी त्याच्याकडे बर्थ डे पार्टी मागितली. मध्यरात्री २.३० च्या सुमारास चुलबुलची हत्या झाल्याचं बोललं जातंय.

Web Title: Chulbul Pandey was murdered there when he went to a massage parlor

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here