Home पुणे चारित्र्याच्या संशयातून कुऱ्हाडीने पत्नीचा खून केला त्याच खोलीत झोपला अन्….

चारित्र्याच्या संशयातून कुऱ्हाडीने पत्नीचा खून केला त्याच खोलीत झोपला अन्….

Breaking News | Pune Crime: चारित्र्याचा संशय घेत आपल्या पत्नीचा खून (Murder) करून त्याच खोलीत पती झोपल्याची धक्कादायक घटना समोर.

slept in the same room where he killed his wife with an ax out of suspicion of character

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याचा संशय घेत आपल्या पत्नीचा खून करून त्याच खोलीत पती झोपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री दारू पिऊन पत्नीशी वाद घातला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह असलेल्या रूममध्येच आरोपी झोपी गेला. दुसऱ्या दिवशी ही घटना समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  पती पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेत होता. त्यांच्यामध्ये या गोष्टीवरून वाद होत असे, घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर तो तिथेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मृत महिलेच्या मुलीने घरी जाऊन पाहिले असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.

लक्ष्मीबाई बाबा जाधव (वय ४५, रा. बुर्केगाव ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, पती बाबा जाधव (वय ५४ वर्षे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय बुर्केगावात राहत होते. पती पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होता. सोमवारी रात्री दोघांचा पुन्हा वाद झाला.मध्यरात्री आरोपी बाबा जाधवने  लक्ष्मीबाई यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात असताना बाबाही झोपला. दरम्यान त्यांची मुलगी निकिता पवार आईला फोन करत होती. मात्र आई फोन उचलत नाही. ती कामावर देखील न आल्याने ती घरी गेली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, चारित्र्यांचा संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. लोणीकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Web Title: slept in the same room where he killed his wife with an ax out of suspicion of character

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here