मुलींचा गळा आवळून खून; नंतर चौथ्या मजल्यावरून उडी !
Breaking News | Nashik: पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल, नाशिकची हृदयद्रावक घटना; कृत्याआधी व्हिडीओ केला
नाशिक : पोटच्या दोन मुलींचा गळा आवळून खून करीत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून विवाहितेने उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आडगाव शिवारातील कोणार्कनगर परिसरात घडली. पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी तिने स्वतः सह ७ वर्षीय मुलीचा व्हिडीओ तयार करून त्यात आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. तसेच चिठ्ठीही लिहून ठेवली होती.
अश्विनी स्वप्निल निकुंभ (वय ३०) असे विवाहितेचे नाव आहे. आराध्या स्वप्निल निकुंभ (७) व अगस्त्या स्वप्निल निकुंभ (२, तिघेरा. हरिवंदन अपार्टमेंट, कोणार्कनगर) या चिमुकलींचा खून झाला आहे. मंगळवारी (दि. ७) मध्यरात्री दोन्ही मुलींचा खून करीत अश्विनी यांनी बुधवारी सकाळी सातच्या सुमारास इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात तसेच अश्विनी यांनी लिहिलेल्या आत्महत्येपूर्वी चिठ्ठीनुसार, अश्विनी व स्वप्निल यांच्यात कौटुंबिक वाद होते. त्यावरून दोघांमध्ये कायम वाद होत होते.
चिठ्ठीनुसार, भूतकाळात त्यांच्यात वाद झाले होते. तसेच अश्विनी हिचे स्वप्निलचा भाऊ तेजस ऊर्फ शंभू व बहीण मयुरी सोमवंशी हिच्यासोबत वाद झाले होते. त्याचा राग मनात ठेवून स्वप्निलने अश्विनीसोबत वाद घातले. त्यावरून स्वप्निलने ब्लॅकमेल करीत शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप अश्विनीने चिठ्ठीत केला आहे. माय-लेकीने व्हिडीओत सांगितली आपबिती…
अश्विनीने १ मिनिट २२ सेकंदांच्या व्हिडीओत तिच्यावरील आपबिती सांगत आत्महत्या करत असल्याचे सांगितले, तर १७ सेकंदांच्या व्हिडीओत मोठी मुलगी आराध्य, ‘पप्पा, तू मम्मीला खूप त्रास दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही मम्मासोबत चाललोय. तू राहा तुझ्या फॅमिलीसोबत सुखी, तुझ्या ताऊ आणि शंभू काकासोबत. आम्ही फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मरणार आहोत,’ असे अश्रृंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगताना दिसत आहे.
Web Title: strangulation of girls Then jump from the fourth floor
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study