मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, तीन महिलांची सुटका
Breaking News | Pune Crime: स्पा सेंटर चालक, मालक आणि व्यवस्थापक काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे कारवायांमधून उघडकीस.
पिंपरी: स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोन आस्थापनांवर पिंपरी-चिंचवड अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. स्पा सेंटर चालक, मालक आणि व्यवस्थापक काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे कारवायांमधून उघडकीस आले आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेस्टिंग स्क्वेअर मॉलमधील दरीज स्पा या मसाज पार्लरमध्ये काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरीत्या मुलींना स्पाच्या नावाखाली जास्त पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी
मारून कारवाई करत स्पा व्यवस्थापक उमेश उर्फ अनिकेत इंद्रजीत दुबे (रा. बाणेर गाव, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली. उमेश दुबे आणि स्पा सेंटरची मालक महिला यांनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले होते. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केली.
Web Title: Prostitution in the name of massage, three women freed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study