Home अहमदनगर अहमदनगर:  तळघरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा

अहमदनगर:  तळघरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा

Breaking News | Ahmednagar: तळघरात सुरू असलेल्या एमएच १६ हुक्का पार्लरवर नगर शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने छापा (Raid) टाकला.

Raid the hookah parlor in the basement

अहमदनगर: सर्जेपुरा परिसरातील मुस्कान एन्टरप्रायजेसच्या तळघरात सुरू असलेल्या एमएच १६ हुक्का पार्लरवर नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने बुधवारी (दि. १३) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार राजू जाधव यांच्या फिर्यादीवरून हुक्का पार्लर चालविणारा कृष्णा इंगळे (पूर्ण नाव माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे.

दरम्यान पोलिसांनी सदर ठिकाणाहून तंबाखूजन्य पदार्थ, काचेचे पॉट, चिलीम असा १४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्जेपुरा परिसरात इंगळे हेल्थ क्लबच्या समोर मुस्कान एन्टरप्रायजेसच्या तळघरात कृष्णा इंगळे हा एमएच १६ नावाचा हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक भारती यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर, महेश मगर, हेमंत खंडागळे, सागर व्दारके यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने बुधवारी सायंकाळी सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता हुक्का पार्लर सुरू असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच चालक कृष्णा इंगळे पसार झाला. पोलिसांनी पंचासमक्ष हुक्का पार्लरमधील सर्व साहित्य जप्त करून कृष्णा इंगळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Raid the hookah parlor in the basement

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here