अहमदनगर: कारच्या धडकेत बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: भरधाव कारने धडक देऊन झालेल्या अपघातात (Accident) नगरमधील बांधकाम व्यावसायिकाचा जागीच मृत्यू.
अहमदनगर : भरधाव कारने धडक देऊन झालेल्या अपघातात नगरमधील बांधकाम व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास झाला. अजय चंद्रकांत आकडे (वय ५४, रा. शिंदे मळा, बालिकाश्रम रोड) असे निधन झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.
आकडे हे सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडनेप्रेमदान चौकातून त्यांच्या बालिकाश्रम रोडवरील शिंदे मळ्यातील घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सांयकाळी नातेवाइकांनी तोफखाना पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Web Title: Construction worker killed in car collision Accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study