Home Accident News स्पर्धेला निघालेल्या क्रिकेटपटूवर काळाचा घाला, चार खेळाडूंचा जागीच मृत्यू, मिनी बसचा अपघात

स्पर्धेला निघालेल्या क्रिकेटपटूवर काळाचा घाला, चार खेळाडूंचा जागीच मृत्यू, मिनी बसचा अपघात

Breaking News | Amravati Accident: सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला धडक दिल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्‍यू. (four died)

Four players died on the spot mini bus Accident

अमरावती : क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्‍वर नजीक शिंगणापूर येथे सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला धडक दिल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण गंभीररीत्‍या जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी घडला. जखमींवर येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय आणि खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व तरूण अमरावतीहून यवतमाळ येथे एका क्रिकेट स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी जात होते.

श्रीहरी राऊत, आयुष बहाळे, सुयश अंबर्ते, संदेश पाडर अशी मयत तरूणांची नावे आहेत. येथील रुक्मिणी नगर आणि रवी नगर परिसरात राहणारे १४ ते १५ तरूण यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट सामन्‍यासाठी टेम्‍पो ट्रॅव्‍हलरने जात होते. सकाळी नऊ वाजताच्‍या सुमारास शिंगणापूर फाट्यानजीक एका भरधाव सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्हलरला धडक दिली. अपघातात चार तरूणांना जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण जखमी झाले. जखमींना नांदगाव खंडेश्‍वर येथील रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. त्‍यातील पाच गंभीर जखमींना अमरावती येथील रुग्‍णालयात हलविण्‍यात आले.

Web Title: Four players died on the spot mini bus Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here