भरती व्हायचे म्हणून रनिंग करीत असताना युवकाच्या जीवावर बेतले
Breaking News | Ahmednagar: पहाटेच्यावेळी धावताना ब्राम्हणीच्या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू.
राहुरी: राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील प्रसाद कारभारी सोनवणे हा १८ वर्षाचा युवक पहाटेच्या दरम्यान परिसरातील मुळा उजवा कालव्याच्या बाजूला धावत असताना (रनिंग) हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, ब्राह्मणीतील शेतकरी कारभारी सोनवणे यांचा मुलगा प्रसाद सोनवणे हा नियमित पहाटेच्या दरम्यान दोन ते तीन किलोमीटर रनिंग करत असतो. जीवनामध्ये आपण कुठेतरी भरती व्हायचे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून व्यायाम करणे आणि रनिंग करणे हा त्याचा दिनक्रम होता. सकाळी उठून रनिंगला जात असतानाच मुळा उजवा कॅनॉलवर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला व तो जागेवर कोसळला.
त्याच्या पाठीमागून रनिंग करत असताना एकाजणाला प्रसाद हा तिथे पडलेला दिसला. त्याने त्याच्या कुटुंबियांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर वडील व भाऊ घटनास्थळी येऊन प्रसादला तातडीने राहुरी येथे दवाखान्यात हलवले. परंतु वैद्यकिय आधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे ब्राह्मणी परिसरावर शोककळा पसरली आहे. प्रसाद हा महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.
Web Title: youth dies of heart attack while jogging at dawn
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study