सखा भाऊ झाला पक्का वैरी! पैश्याच्या वादातून सैनिक भावाची केली हत्या
Beed Crime: पैशाच्या वादातून एका भावाने सैनिक असलेल्या मोठ्या भावाचा खून (Murder) केल्याची घटना.
बीड: बीड जिल्हातील आष्टी येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून एका भावाने सैनिक असलेल्या मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. पैशाच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केली आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण विनायक पवार असं हत्या झालेल्या जवानाचे नाव होते. मृत तरुण हा सीआरपीएमध्ये कामाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद विनायक पवार असं आरोपी भावाचे नाव आहे. प्रवीण गेल्या पंधरा दिवसांपासून सुट्टीच्या निमित्ताने घरी आला होता. प्रवीण हा झारखंड हा येथे सीआरपीएफमध्ये जवान आहे. प्रवीण आणि विनोद यांच्यात पैशावरून वाद झाला. हा वाद पेटला आणि विनोदने प्रवीणला बेदम मारहाण केली. या मारहाणीत विनोद गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच आंभोरी पोलिसांनी दखल घेतली. त्यांनी तातडीने दवाखान्यात येत पंचनामा केला. प्रवीण यांची पत्नी सीमा पवार यांनी या प्रकरणी पोलिसांना फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी प्रवीणच्या आई झुंबरबाई पवार, वडिल विनायक पवार, सोनाली पवार आणि मुख्य आरोपी विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी विनोदला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
Web Title: soldier’s brother was killed due to a dispute over money
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App