संगमनेर: घराच्या बांधकामाला पाणी मारत असताना धक्कादायक घटना, युवकाचा मृत्यू
Sangamner News: विजेच्या तीव्र धक्क्याने (Electric Shock) तरुणाचा मृत्यू.
संगमनेर: शहरातील शिवाजी नगर उपनगरातील 17 वर्षीय मुलाचा विजेचा तीव्र धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुदैवी घटना रविवारी सकाळी घडली.
लक्ष्मण रामा गायकवाड असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, हा तरुण सकाळी दहा वाजता आपल्या नवीन घराच्या बांधकामाला पाणी मारत असताना विजेच्या तुटलेल्या वायरला हात लागल्याने विजेचा तीव्र धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटना लक्षात येताच त्याला तातडीने घुलेवाडी येथील ग्रामिण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी लक्ष्मन गायकवाड यास मृत घोषीत केले. सदरील घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
Web Title: Death of a young man due to electric shock
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App