अहमदनगर ब्रेकिंग: वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाचा खून
Ahmednagar News: वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणातून तरुणाला मारहाण करून त्याचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना.
अहमदनगर: वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणातून तरुणाला मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना वाळकी (ता. नगर) शिवारात गुरुवारी (ता. २३) रात्री घडली. आप्पासाहेब लांडगे (रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी अलका लांडगे यांनी शुक्रवारी (ता. २२) रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण पिराजी बोठे, प्रवीण ऊर्फ पंकज अरुण बोठे, मनोज राधाकिसन भालसिंग व इंदूबाई अरुण बोठे (सर्व रा. वाळकी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी प्रवीण ऊर्फ पंकज अरुण बोठे याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आप्पासाहेब लांडगे हे वाळकी येथील कापड दुकानात काम करत होते. ते गुरुवारी सकाळी कामावर गेले होते. सायंकाळी कामावरून घरी येत असताना वाळकी येथील शाळेजवळ त्यांच्याकडून बोठे कुटुंबातील नातेवाईकाला वाहनाचा धक्का लागला. याच कारणातून आप्पासाहेब यांना मारहाण करण्यात आली.
दरम्यान, आपला पती कामावरून अजून घरी आला नाही म्हणून फिर्यादीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता, आप्पासाहेब यांना मारहाण होत असल्याचे समजताच फिर्यादींनी पुतण्याला घटनास्थळी पाठविले. तेव्हा आप्पासाहेब याचा अपघात झाला असल्याने तो बेशुद्ध झाला असल्याचे तेथील लोकांनी सांगितले. फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांनी अधिक माहिती घेतली असता, वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी आप्पासाहेब यांना मारहाण केल्याचे समोर आले. त्यानुसार चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Young man was Murder due to being hit by a vehicle
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App