Home अहिल्यानगर Rain: नगरमध्ये तीन तास धुव्वाँधार पाऊस; या नदीला पूर

Rain: नगरमध्ये तीन तास धुव्वाँधार पाऊस; या नदीला पूर

Ahmednagar News: तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) शहराची दाणादाण, सीना नदीला पूर परिस्थिती.

Ahmednagar Rain Three hours of smoke in the city Flood this river

अहमदनगर: नगरमध्ये शनिवारी सायंकाळी तब्बल तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने शहराची दाणादाण उडाली आहे. बुरुडगाव रस्त्यावरील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या आनंदधाममधील जैनमुनी राष्ट्रसंत आचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या समाधीस्थळापर्यंत पाणी पोहोचले. याशिवाय स्टेशन रस्त्यावरील अचानक वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी घुसले तसेच याच परिसरात रस्त्यावर एक झाडही पडले. नगरच्या रेल्वे स्थानक आणि उड्डाणपूलाखाली पाण्याचा पाटच वाहत असल्याचा भास झाला. नगर शहरात पहिल्यांदा झालेल्या धुव्वाँधर पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. तर मुसळधार पावसामुळे पहिल्यांदा नगरच्या सीना नदीचे पात्र दुथडी भरून वाहिले. सीना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन साठलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याचे काम केले. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारासच आकाशात अंधारून आले होते. यावेळी शहर आणि परिसारत अंधारच पडला होता. त्यानंतर चार ते साडेचारच्या सुमारास सुरू झालेली मुसळधार तब्बल तीन तास कायम होता व नंतरही बराचकाळ पावसाची संततधार सुरू होती. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात नगर शहरात प्रथमच झालेल्या या पावसाने शहराची दयनीय अवस्था अधिक दयनीय केली. नेहमीप्रमाणे शहराच्या मध्यवस्तीतील चितळे रस्ता, माळीवाडा, नवीपेठ, कापड बाजार, गंज बाजार, सोनार गल्ली, दिल्लीगेट, नालेगाव भागात रस्त्यावर पाणीच पाणी होते. सायंकाळची वेळ असल्याने व पावसाचा अंदाज आल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. पण व्यावसायिकांचे मात्र हाल झाले. अनेक ठिकाणचा वीज पुरवठाही बंद पडल्याने अंधाराचे साम्राज्य होते.

शहरातील कापडबाजारात अनेक ठिकाणी दुकानात पाणी शिरले. रेल्वे स्थानकातून पाणी वाहत होते. पाऊस सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे विज गायब झाली. शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून या पावसामुळे मंडपाचे नुकसान अथवा अन्य नुकसान झाले नसले तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांची चांगली तारांबळ उडाली. शहरात सर्वत्र पाणीच पाणी होते. अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह कोसळणार्‍या पावसामुळे झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडले, तारा तुटल्या, शहरातील मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. कामानिमित्त ग्रामीण भागातून नगरमध्ये आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डे बुजविण्यात आले होते त्यावरील डांबर जोरदार झालेल्या पावसामुळे वाहून गेले. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य करण्यात येत होते. झाडे पडलेल्या ठिकाणी मनपाचे पथक दाखल होऊन ते हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Ahmednagar Rain Three hours of smoke in the city Flood this river

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here