Home अकोले अहमदनगर: सलग दुसर्‍या दिवशी अतिवृष्टी, निळवंडेतून पाणी सोडले, चार दिवस अलर्ट

अहमदनगर: सलग दुसर्‍या दिवशी अतिवृष्टी, निळवंडेतून पाणी सोडले, चार दिवस अलर्ट

Ahmednagar rain News: जिल्ह्यातील सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून 71 मंडळात दमदार पाऊस,  गेल्या दोन दिवसांत पावसाची सरासरी 52 टक्क्यांवरून 66 टक्क्यांपर्यंत.

Heavy rain for the second day in a row, water released from Nilawande, alert for four days

अहमदनगर: मोठ्या प्रतीक्षेनंतर नगरकरांना गणपती बाप्पा पावले आहेत. सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून 71 मंडळात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत पावसाची सरासरी 52 टक्क्यांवरून 66 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पळशी, टाकळी ढोकेश्वर, पारेनर शहर, राहुरी तालुक्यातील सात्रळ, देवळाली प्रवरा, ढवळपुरी आणि संगमनेर तालुक्यातील साकूर या महसूल मंडळात शुक्रवारी अतिवृष्टी झाली असून याठिकाणी काही तासात 65 मिली मिटर पेक्षा जादा पावसाची नोंद झालेली आहे.

यासह नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुईछत्तीशी (नगर). पारनेर, भाळवणी, वाडेगव्हाण, वडझीरे, निघोज, टाकळी, पळशी (पारनेर). श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी, चिंबळा (श्रीगोंदा). जामखेड, अरणगाव (जामखेड). ढोरजळगाव (शेवगाव). पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, मिरी (पाथर्डी). नेवासा बु, नेवासा खु, चांदा, घोडेगाव, वडाळा, सोनई (नेवासा). राहुरी, सात्रळ, ताराबाद, देवळाली, टाकळीमियॉ, ब्राम्हणी, वांबोरी (राहुरी). संगमनेर, धांदरफळ, आश्वी, सीबलापूर, तळेगाव, समानापूर, घारगाव, डोळसणे, साकूर, पिंपळणे (संगमनेर). अकोले, वीरगाव, समशेरपूर, साकीरवाडी, राजूर, शेंडी, कोतुळ, ब्राम्हणगाव (अकोले). कोपरगाव, रवंदेख, सुरेगाव, पोहेगाव (कोपरगाव). श्रीरामपूर, बेलापूर (श्रीरामपूर). राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा (राहाता), या ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे.

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण दुसर्‍यांदा ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातील विसर्ग निळवंडेत दाखल होत आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी काल दुपारी 8064 दलघफू पाणीसाठा कायम ठेऊन 350 क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला. पाणलोटातील पाऊस वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे.

भंडारदरा पाणलोटात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे रविवारी रात्री 9.15 वाजता स्पिलवेतूनही 609 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. विद्युतगृह क्र.1 मधून 820 असे एकूण 1429 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत होते. कालही अंब्रेला फॉल सुरू झाला आहे. धरणातून एकूण 1647 क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यामुळे निळवंडेतील पाणीसाठाही वाढला आहे. पाऊस वाढल्यास खबरदारी म्हणून या धरणातून काल दुपारपासून 350 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, काल भंडारदरा पाणलोटात सायंकाळी 7 नंतर पुन्हा पावसास सुरुवात झाल्याने पाण्याची आवक वाढणार आहे.

भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून राज्यात बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यत व्यक्त केली असून नगर जिल्ह्यात 27 तारखेपर्यंत यलो अर्लट जारी करण्यात आला आहे.

Web Title: Heavy rain for the second day in a row, water released from Nilawande, alert for four days

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here