पायी जाणाऱ्या महिलांना चिरडून टेम्पोची दुचाकीला धडक, दोन महिलांचा मृत्यू; आई-वडील जखमी
Ahmednagar Accident: जामखेडकडून नगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने पायी जात असलेल्या दोन महिलांना चिरडून दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दोन महिला ठार.
अहमदनगर: जामखेडकडून नगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने पायी जात असलेल्या दोन महिलांना चिरडून दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दोन महिला ठार झाल्या असून, दुचाकीवरून असलेल्या जात चिमुकल्यासह आईवडील जखमी झाले आहेत. हा अपघात नगर- जामखेड रोडवर निंबोडी (ता. नगर) जवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वत्सलाबाई भानुदास चांदणे व शाकुंतला विजय चांदणे ( दोघी रा. निंबोडी) असे मयत झालेल्यांची नावे आहेत. जखमीमध्ये सपान सूरज शेंडगे, सुरज जगन्ना शेंडगे आणि दक्ष सुरज शेंडगे यांचा समावेश आहे. नगर- जामखेड रोडवरून टेम्पो ( एमएच १६. एवाय ४१६०) हा नगरच्या दिशेने येत होता, तर शेंडगे हे पती व मुलासह दुचाकीवरून निंबोडीच्या दिशेने जात होते. टेम्पाने शेंडगे यांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात शेंडगे हे स्वत: व पत्नी सपना आणि मुलगा दक्ष हे जखमी झाले. त्यापूर्वी टेम्पोने रस्त्याने पायी जात असलेल्या दोन महिलांना निंबोडी गावाजवळ पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात दोन्ही महिला जबर जखमी झाल्या. अपघातानंतर चालक पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
Web Title: Accident Two women were killed when a tempo collided with a bike, crushing women on foot
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App