संगमनेर: दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी
Sangamner Accident: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घारगाव येथे दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू.
संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घारगाव येथे दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चार वाजता घडली.
मोहन भाऊ दुधवडे (वय ६५, रा- माळवदवाडी, खंदरमाळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहन दुधवडे हे खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माळवदवाडी येथील रहिवासी होते. मोहन दुधवडे व वाळिबा कमा मधे हे दोघेजण मंगळवारी दुपारी दुचाकीवरून बोट्याकडून घारगावकडे येत असताना पेट्रोल पंपाजवळ आले असता दुधवडे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते रस्त्यावर पडले. या अपघातात दुधवडे यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाळिबा मधे हे जखमी झाले.
याप्रकरणी गोपीनाथ भाऊ दुधवडे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलिस नाईक राजेंद्र लांघे करीत आहेत
Web Title: Accident One died and one injured after falling from the bike
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App