मुलीचे लैंगिक शोषण करून धमकावणाऱ्या पित्याला जन्मठेप
Sexually Abused: स्वतःच्याच मुलीचे बळजबरीने लैंगिक शोषण करून ही बाब कोणाला सांगितल्यास आई आणि भावाला ठार मारण्याची धमकी.
अकोला: घरात कोणी नसताना स्वतःच्याच मुलीचे बळजबरीने लैंगिक शोषण करून ही बाब कोणाला सांगितल्यास आई आणि भावाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या ४५ वर्षीय पित्यास पाच गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेसह ५ लाख ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अवघ्या १३ महिन्यात हा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने दिला.
१५ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती सकाळी घरकाम करीत होती. गुंड प्रवृत्तीच्या पित्याने स्वतःच्या मुलीवर अतिप्रसंग केला व तिला मारहाण करून ही घटना कोणाला सांगितल्यास तिच्या भावास व आईस आणि तिला मारून टाकण्याची धमकी दिली.
मुलीने ही बाब घराजवळ राहणाऱ्या काकूला सांगितली. काकूने ही बाब तिच्या आईला सांगितली. त्यानंतर उरळ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (३), ५०६, पोक्सो कायदा कलम ३-४, ५ (एल) (एन), ७-८ नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उरळचे ठाणेदार अनंत वडतकर यांनी तातडीने कारवाई करून जलदगतीने तपास पूर्ण केला आणि आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
दररोज करू शकता १ हजार ते १५ हजार रुपयांची कमाई ते ही घरबसल्या ऑनलाईन | Earn Money Online
१३ महिन्यांत निकाल
या खटल्याचा निर्णय अवघ्या १३ महिन्यांत लागल्याने या परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर समाजाच्या सर्वच स्तरात संतापाची लाट पसरली होती.
Web Title: father who sexually abused and threatened his daughter
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App