अहमदनगर जिल्हा शैक्षणिक निर्देशांकात सुधारणा, जिल्हा टॉप टेन मध्ये
Ahmednagar Educational Index: नगर जिल्ह्याची शिक्षणात प्रगती, शैक्षणिक निर्देशांकात नगर जिल्हा २२ वरून नवव्या क्रमांकावर.
अहमदनगर: शासनाकडून शाळांना, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून दरवर्षी राज्याचा शैक्षणिक निर्देशांक निश्चित केला जातो. यात नगर जिल्हा मागील वर्षीच्या तुलनेत २२ वरून ९व्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्याच्या निर्देशांकात समाधानकारक वाढ झाली आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून २०१७-१८ पासून पीजीआय (परफॉरमन्स ग्रेडिंग इंडेक्स) अर्थात शैक्षणिक निर्देशांकानुसार राज्याचा शैक्षणिक निर्देशांक निश्चित करण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. त्याचा मुख्य उद्देश शालेय शिक्षणात बदलांना चालना देणे हा आहे. यात सुविधांसोबतच गुणवत्तेवर भर दिला जातो. जिल्ह्याचा शैक्षणिक निर्देशांक भरताना ६ मुख्य निर्देशांक व गुणांकन केले जाते. त्याअंतर्गत असणाऱ्या एकूण ८३ यू-डायस प्लस प्रणालीवर शाळांनी सरकारकडून मंजूर बाबींची माहिती आहे. निर्देशाकांच्या आधारे ६०० गुणांचे भरलेली माहिती, राष्ट्रीय सर्वेक्षण, (भौतिक सुविधा, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा), स्कूल सेफ्टी व चाइल्ड प्रोटेक्शन अंतर्गत मंजूर बाबी, गव्हर्नन्स प्रोसेस अंतर्गत मंजूर बाबी, स्कूल लीडरशिप डेव्हलपमेंट अंतर्गत मंजूर बाबी, भारत सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत शाळांचा सहभाग (स्वच्छ भारत आणि जलसुरक्षा, फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, नागरी कर्तव्य पालन अभियान आदी) या स्त्रोतांद्वारे भारत सरकारकडून शैक्षणिक निर्देशांक काढला जातो.
या निर्देशांकात २०१९-२०मध्ये नगर जिल्हा २२ व्या क्रमांकावर होता. परंतु २०२०-२१ या वर्षात यात कमालीची सुधारणा होऊन ४२४.२५ गुण मिळवत अहमदनगर जिल्हा समग्र शिक्षा योजनेतील भारत राज्यात नवव्या क्रमांकावर झेपावला
सातारा पहिल्या क्रमांकावर
■ या यादीत सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
■ मागील वर्षीही तो पहिल्याच क्रमांकावर होता.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
■ नागपूर जिल्हा मात्र सर्वात खालच्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
Web Title: Improvement in Ahmednagar Educational Index
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App